#देशाच्या अर्थव्यवस्थेपूर्वीच शेअर बाजारचे भांडवल होईल 5 लाख कोटी डॉलर

 #देशाच्या अर्थव्यवस्थेपूर्वीच शेअर बाजारचे भांडवल होईल 5 लाख कोटी डॉलर

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सेन्सेक्स ने 50,000 च्या आकड्याला स्पर्श केल्यानंतर भलेही गेल्या दोन दिवसात त्यात घट झाली असली तरी आगामी काळात शेअर बाजाराची गती अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त होणार आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन (एम-कॅप) देशाच्या अर्थव्यवस्थेपूर्वीच 5 लाख कोटी डॉलर (365 लाख कोटी रुपये) होऊ शकते. सध्या ते 2.7 लाख कोटी डॉलर म्हणजेच 194 लाख कोटी रुपये आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 पर्यंत भारताला 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बीएसई चे बाजार भांडवल 5 लाख कोटी डॉलरवर पोहोचण्यासाठी सेन्सेक्स 90 हजारांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. पुढील 3-4 वर्षात बाजारात 100 हून अधिक कंपन्या सूचीबद्ध होऊ शकतात. यात एलआयसी, रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल यांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत या कंपन्यांचे बाजार भांडवल शेअर बाजाराचे बाजार भांडवल वाढविण्यासाठी मदत करेल.
गेल्या वर्षीच्या मार्चमधील 25,690 च्या निचांकी पातळीवरुन सेन्सेक्स जवळपास दुप्पट झाला आहे. बीएसई वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवलही जवळपास दुप्पट झाले आहे. त्यावेळी ते 101 लाख कोटी होते. आता बाजार भांडवल 194 लाख कोटी रुपये आहे. मात्र पुढे या वेगाने सेन्सेक्स वाढणे अवघड आहे. मार्चमध्ये कोरोनामुळे बाजारात मोठी घसरण झाली होती आणि पुन्हा वेगाने पुनर्प्राप्ती झाली.
सीएनआय रिसर्चचे अध्यक्ष किशोर ओस्तवाल सांगतात की, आगामी काळात अनेक घटना भारताच्या अर्थव्यवस्थेसह शेअर बाजारालाही गती देऊ शकतील. सरकार आता विम्यातील परकीय गुंतवणूकीची मर्यादा 75 टक्क्यांपर्यंत वाढवत आहे. यामुळे परदेशी पैसा देशात येईल. सध्या ही मर्यादा 49 टक्के आहे. मागील वर्षीही विक्रमी परकीय गुंतवणू्क झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत 1.70 लाख कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली. सर्वात जास्त पैसा ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात आला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तर 60-60 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आली आहे.
तज्ञांच्या मते असेही होऊ शकते की बीएसई चे बाजार भांडवल काही कारणास्तव 2024 पूर्वीच 5 लाख कोटी होईल. परंतु अर्थव्यवस्थेसह ते निश्चितपणे 5 लाख कोटी डॉलरचे मात्र नक्कीच होईल. आताही जीडीपी आणि बाजार दोघांचाही आकार सारखाच आहे. अर्थव्यवस्था जसजशी सुधारेल तसा बाजारही वाढत जाईल.
Tag-BSE/Market Cap/Indian Economy
PL/KA/PL/23 JAN 2021

mmc

Related post