तव्यावरची ब्रोकोली

 तव्यावरची ब्रोकोली

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
एक पाव ब्रोकोली
लसणाचा अर्धा गाठा
छोटासा कांदा
मोहरी
जिरे
हिंग
तेल
मीठ
हळद
मिरची

क्रमवार पाककृती:
१) ब्रोकोली भाजी हातानीच निवडून घ्यावी आणि देठाकडचा भाग चिरुन घ्यावा.

२) तवा मध्यम आचेवर तापत ठेवा आणि तो तापत असताना लसूण सोलणे आणि कांदा चिरणे ह्या दोन गोष्टी आटोपून घ्या म्हणजे उगाच तवा तापायला ठेवताना तिष्ठत रहावे लागणार नाही:

४) आता मोहरी, जिरे, हिंग, मग हिरवी मिरची, लसूण, कांदा एकत्रित करुन कांदा गुलाबी होऊ द्या:

५) ब्रोकुली अरत परत करेपर्यंत ती थोडी आक्रसते त्यामुळे त्यावर झाकण ठेवले की ते बरोबर तव्याला टेकते आणि हवा आत शिरत नाही.

५) आता एक दोन मिनीटे उलटली की तव्यावरचे झाकण हळुच बाजुला सारुन ब्रोकुली अरत परत करा आणि परत एकदा झाकण ठेवा. दोन मिनिट झाले की गॅस विसझून टाका पण पुढील दहा मिनिटे झाकण नाही काढले तर भाजी अजून छान चवदार लागते. ही बघा तयार झालेली भाजी. ही भाजी फार गलगल शिजवू नये. सत्व कमी होते. आणि तशीही ब्रोकुली ही फायबर असलेली भाजी आहे ती जरा कमी शिजवून खावी. ब्रोकुली ही योग्य प्रमाणात शिजवली की आणखीच हिरवी होऊन उजळते.

तव्यावरची ब्रोकोली

PGB/ML/PGB
1 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *