ब्रिटाटा

lifestyle food recipes
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ मोठा कांदा
१ मोठा बटाटा
आलं, लसूण, मिरची वाटून – १ चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
२-३ अंडी
मीठ
क्रमवार पाककृती:
कांद्याच्या तिरप्या खापी आणि बटाट्यांच्या काचर्या चिरून घ्या.
तेलावर हिंग, हळदीची फोडणी करा.
त्यावर आधी कांदा घालून परता. त्यावर आलं-लसूण-मिरची वाटण आणि गरम मसाला घालून परता. तेल सुटायला लागलं की काचर्या घालून परता. चवीनुसार मीठ घाला.
आधणाचं झाकण ठेवून अधूनमधून परतत काचर्या शिजवून घ्या.
काचर्या पूर्ण शिजल्या की त्यावर अंडी फोडून घाला. आता परतायचं नाही.
झाकण ठेवून मंद गॅसवर अंडी शिजू द्या.
अंडी शिजली की भाजी झाली.
आता गरम पोळी/फुलक्यांबरोबर खा किंवा ब्रेडमधे सँडविच करून.
Britta
ML/ML/PGB
5 Dec 2024