ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केली गृहमंत्र्यांची हकालपट्टी
 
					
    लंडन, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची गृहमंत्री पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हा निर्णय घेतला आहे. लंडनच्या ‘द टाइम्स’ या वृत्तपत्रात सुएला ब्रेव्हरमन यांनी एक लेख लिहिला होता. त्यात लंडनची पोलीस यंत्रणा पॅलेस्टाईन धार्जिणी आहे असा आरोप केला होता. तसंच येथील यंत्रणेला कायदा सुव्यवस्थेची चिंता नाही असंही लेखात म्हटलं होतं. त्यामुळेच आता त्यांना गृहमंत्रीपदावरुन हाकलण्यात आलं आहे.
सुएलांचे विधान ब्रिटनच्या मध्यपूर्व धोरणाच्या विरोधात आहे आणि त्या अशी विधाने करत आहेत, जे ब्रिटनमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपल्याचा संकेत देतात, अशी मागणी अनेक दिवसांपासून सुनक यांच्या पक्षातून केली जात होती. अलीकडे त्यांनी ब्रिटीश पोलिसांना फटकारले होते.
43 वर्षीय सुएला ब्रेव्हरमन या बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अॅटर्नी जनरल होत्या. त्या हिंदू-तमिळ कुटुंबातील आहे. त्यांचे पालक केनिया आणि मॉरिशसमधून ब्रिटनमध्ये आले असले तरी. सुएलांचा जन्म 3 एप्रिल 1980 रोजी लंडनमध्ये झाला. त्या वेम्बलीमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या त्यामुळे त्यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे.
SL/KA/SL
13 Nov. 2023
 
                             
                                     
                                    