आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतले संक्षिप्त निर्णय

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
- मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर
( मराठी भाषा विभाग) - पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार
( गृह विभाग) - अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता
( सामान्य प्रशासन विभाग) - केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता
( नगरविकास विभाग) - श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार
( सार्वजनिक बांधकाम विभाग) - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प
( मदत व पुनर्वसन) - भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज
( वित्त विभाग) - राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ
( आरोग्य विभाग) - महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार . नफ्यात आणणार
( दुग्धविकास विभाग) - मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार
( जलसंपदा विभाग) - मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार
( जलसंधारण विभाग) - शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता २५ हजार रुपये अनुदान संस्थाना.
( महिला व बालविकास) - मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.
(वैद्यकीय शिक्षण) - आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.
( कौशल्य विकास) - कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.
- ( ऊर्जा विभाग)
- शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार
११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता
( ऊर्जा विभाग) - पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार
(पशुसंवर्धन व दुग्धविकास) - पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता
( महसूल विभाग) - म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन
( वैद्यकीय शिक्षण विभाग) - आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ
- ( सार्वजनिक आरोग्य विभाग)
- मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार
( परिवहन विभाग) - मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार.
उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता
( नगरविकास विभाग) - मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते
( ग्रामविकास विभाग) - भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार
- महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन
( महसूल व वन विभाग) - जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता
( परिवहन विभाग) - दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना
( पशुसंवर्धन व दुग्धविकास)
ML/ML/SL
13 March 2024