दारणा नदीवरील पुलाला भगदाड; नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास…
नाशिक, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : घोटी सिन्नर राज्य मार्गावरील देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाला भलं मोठं भगदाड पडले आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने समृद्धी महामार्ग तसेच सिन्नर आणि भंडारदरा , एसएमबीटी रुग्णालय आणि शिर्डीकडे ये-जा करत असतात. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे पद्धतशीर पणे डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
दरवर्षी पुलाला भगदाड पडल्याची घटना घडतात. मात्र तात्पुरती डागडुजी करून मलमपट्टी केली जाते. संबंधित अधिकारी आणि प्रशासन सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेसारखी घटना घडण्याची वाट पाहतय का? असा प्रश्न देवळे , घोटी ग्रामस्थांना निर्माण झाला आहे. फुलाला भले मोठे भगदाड पडले असल्याने नागरिकांना जीव मोठे धरून प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे घोटी सिन्नर महामार्गवरील देवळे पुलावर मोठे भगदाड पडले आहे. गेल्या वर्षापूर्वीच या पुलाच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात आला होता, तरी देखील आता मोठे भगदड पडले आहे. त्यामुळे हा पूल कधी कोसळेल याबाबत शाश्वती नाही, पूल कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे, मात्र याकडे सबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत. दरम्यान या पुलावरील भगदाड पडल्याने सावित्री पुलाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि नेत्याकडून तसेच वाहन धारकांकडून होत आहे.
ML/KA/SL
30 Sept. 2023