जिल्ह्यातील वीटभट्ट्या होणार ‘सील’; इंधन म्हणून

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशात आज वायु प्रदूषणाचा विषय गंभीर होत आहे. दिल्लीत प्रदूषणामुळे हवेत प्रदूषणाचे थर दिसून आल्याचे पाहिले. प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण विभाग कार्यरत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी देशभरातील विटभटट्यांत वापरला जाणारा कोळसा, लाकडांचा वापर बंद करून वीट तयार करताना त्याऐवजी ‘गॅस’चा वापर करावा, असे आदेश केंद्रीय पर्यावरण, वन जलवायू परिवर्तन मंत्रालयाने काढले आहेत
जळगाव जिल्ह्यातही हा आदेश लागू झाला आहे. जिल्ह्यातील वीट भटटी चालकांनी आगामी वर्षभरात वीट तयार करताना कोळसा, लाकडाचा वापर पूर्ण बंद करावा, अन्यथा विटभट्टया सिल’च्या कारवाईचे आदेश प्रदूषण नियंत्रण विभागाला देण्यात आले आहेत.
पावसाळा संपताच नवीन भट्टया सुरू होतात. विट भटट्यांचा सिझन मे-जून अखेरपर्यंत सुरू असतो. शहराबाहेर, गावाबाहेर वीट भट्टी चालक मातीद्वारे विटा करून त्या पक्क्या होण्यासाठी भट्टीत भाजतात. कोळसा, लाकडाचा वापर करून इंधन तयार केले. जे विटभट्टीतील सर्व विटांपर्यंत पोचते.
किमान सहा ते आठ दिवस भट्टीतील विटा तयार होण्यास लागतात. तेवढे दिवस कोळसा लाकूड वापरून भट्टी पेटलेली असते. त्यातून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होउन नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्या परिसरातील नागरिकांच्या फूफूसे निकामी होते, विविध प्रकारचे आजार आणि व्याधी प्रदूषणापासून होतात. असा निष्कर्ष पर्यावरण विभागाने काढला आहे.
Brick kilns in the district will be ‘sealed’; as fuel
ML/KA/PGB
17 Feb 2024