जालन्याच्या महानगरपालिका आयुक्ताना लाच घेताना रंगेहाथ पकडले

जालना दि १७ : जालना महानगरपालिकेत ऐन दिवाळीत अँटी करप्शन विभागाने मोठी कारवाई केली आहे.जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना 10 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. एका कॉन्ट्रॅक्टरकडून ही लाच घेताना आयुक्त खांडेकर यांना पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही लाच कोणत्या कामासाठी मागितली याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजून देण्यात आलेली नाही.
संतोष खांडेकर हे जालना महानगरपालिकेचे आयुक्त असून त्यांनी एका कॉन्ट्रॅक्टरकडे 10 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लाऊन आयुक्त संतोष खांडेकर यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेण्यात आली,
दरम्यान या घटनेनंतर शहरात चर्चांना उधाण आलं आहे.ML/ML/MS