स्तनाचा कर्करोग असलेल्या महिलांनो ही लक्षणे असतील तर व्हा सावध
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्करोग असलेल्या महिलांसाठी खास टिप्स
तणावमुक्त राहा: स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या महिलांसाठी एक महत्त्वाची टीप म्हणजे स्वत: च्या आरोग्यची काळजी घेत असताना मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. गरज भासल्यास समुपदेशनासारखा पर्याय निवडणे जेणेकरुन तणावाचे व्यवस्थापन करता येईल. ध्यानधारणा किंवा योगसाधना केल्यास उपचारादरम्यान येणारा मानसिक तणाव आणि नैराश दूर करण्यास तसेच त्याचे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते.
फळे, भाज्या, कडधान्ये, मसूर आणि तृणधान्याचा समावेश असलेला संतुलित आहाराचे सेवन करा. संपूर्ण उपचार प्रक्रियेदरम्यान रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूण आरोग्यास समर्थन देण्यासाठी योग्य पोषण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
शारीरिकरित्या सक्रिय राहणे हे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यास, थकवा कमी करण्यास आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. एखाद्याच्या गरजेनुसार तयार केलेल्या व्यायामाच्या दिनचर्येबाबत आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा.
फॅालोअप गरजेचा: स्तनाच्या कर्करोगाच्या निदान हा एखाद्यासाठी आव्हानात्मक आणि भावनिक प्रवास ठरु शकतो. पुनर्प्राप्ती प्रक्रियेमध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन यांसारख्या उपचारांमुळे केवळ शारीरिक तर मानसिक उपचारांची देखील गरज भासते. महिलांनी या काळात पुरेशी विश्रांती घेणे, संतुलित आहाराचे सेवन करणे आणि प्रियजन तसेच समुपदेशकांकडे मानसिक आरोग्यावर चर्चा करणे. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. नियमित तपासणी आणि फॅालोअप करणे गरजेचे आहे.
स्तनाच्या कर्करोगासोबत जगणे आव्हानात्मक ठरु शकते, परंतु रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी निरोगी राहणे गरजेचे आहे. यशस्वी उपचार तसेच कर्करोगावर मात करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे आवश्यक आहे. संतुलित आहाराचे सेवन, नियमित व्यायाम तसेच सर्वांगीण आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीचा कर्करोगाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. त्यासाठी एखादी शंका वाटल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी खुलेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे. सकारात्मक मानसिकता बाळगणे आणि कर्करोगावर मात करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणे हे देखील तितकेच आवश्यक आहे
ML/ML/PGB
2 Jun 2024