तारपा वादक भिकल्या धिंडा पालघर जिल्हा परिषदेचे ब्रँड ॲम्बेसेडर

पालघर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्या मधल्या वाळवंडा इथले सुप्रसिद्ध लोककलाकार तारपा वादक भिकल्या धिंडा यांची पालघर जिल्हा परिषदेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभे मध्ये जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते भिकल्या धिंडा यांना जिल्हा परिषदेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून गौरविण्यात आलं.धिंडा यांची तिसरी पिढी ही लोककला जोपासत असून त्यांना केंद्र आणि राज्य स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. संगीत नाटक अकादमी गौरव अमृत पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार, आजादी का अमृत महोत्सव पुरस्कार, पालघर भूषण या आणि यासारख्या अनेक पुरस्कारांनी धिंडा यांना सन्मानित करण्यात आलं आहे. माझा अनेक स्तरावर सन्मान झाला आहे,पण जिल्हा परिषदेने केलेल्या या सन्मानामुळे मला अधिक जगण्याचं बळ दिलं आहे. यासाठी मी अध्यक्ष प्रकाश निकम आणि जिल्हा परिषदेचा आभारी आहे असं मत यावेळी तारपा वादक भिकल्या धिंडा यांनी व्यक्त केलं.
ML/KA/PGB 6 March 2024