गुजरातमधील या गावांचा विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार

 गुजरातमधील या गावांचा विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार

मुंबई,दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कालच गुजरात विधानसभेच्या निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता 8 तारखेला लागणाऱ्या निकालाचे वेध लागले आहेत. पंतप्रधानांचे होम स्टेट असल्यामुळे अर्थातच देशभरातून या निवडणूकांकडे अधिक जगतेने पाहिले जात आहे. निवडणूका यशस्वी होण्यासाठी सर्व प्रयत्न करून देखील गुजरातमधील या तीन गावांनी विकास कामे न झाल्यामुळे विधानसभा निवडणकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे.

राज्य सरकार पाणीटंचाईसह त्यांचे अनेक विकासाचे  प्रलंबित प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील  खेरालू तालुक्यातील वरेठा, डाळीसणा आणि डावोल या तीन गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. पाण्याची मागणी पूर्ण न झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून ही तिन्ही गावे कोणत्याच निवडणुकीत मतदान करत नाहीत. या विधानसभा निवडणूकीत या गावांतील 5,200 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यास नकार दिला.

SL/KA/SL

6 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *