चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार
वर्धा दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यवतमाळ येथे काल पत्रकार परिषदेत पत्रकारांबाबत काढलेल्या उद्गरांवरून आज वर्ध्यात त्यांच्यावर पत्रकारांनी बहिष्कार घातला आहे. Boycott of journalists on Chitra Wagh’s press conference
काल यवतमाळ इथे एका पत्रकाराने मंत्री संजय राठोड यांचेवर चित्रा वाघ यांनी पूर्वी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारले मात्र त्याला नीट उत्तर देण्याऐवजी त्यांचा तोल ढासळला व त्या सुरवातीपासूनच पत्रकारांना दमदाटी केल्यासारख्या बोलू लागल्या, एव्हढेच नव्हे तर पत्रकारांना प्रश्न करण्याचा अधिकार नाही, पत्रकार सुपारीबाज आहे अशा शब्दात त्यांनी पत्रकारांवरच गरळ ओकली होती.
चित्रा वाघ ह्यांची ही मग्रूरीची भाषा पत्रकारांची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे असे मत पत्रकार संघटनांनी व्यक्त केले आहे. स्थानिक भाजप ने पत्रकारांना निमंत्रित करून पत्रकारांचाच अपमान केला आहे. त्यामुळे आज वर्धा इथं होणाऱ्या चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांनी बहिष्कार टाकला असून त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांना जिथे कुठे अशी पत्रकार परिषद होत असेल तिथे बहिष्कार टाकावा असे आवाहन श्रमिक पत्रकारांनी तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा सह अनेक संघटनांनी केले आहे.
ML/KA/SL
12 Nov. 2022