बोपोडीतील शासकीय दूध डेअरीची जागा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचा धक्कादायक प्रकार उघड!

 बोपोडीतील शासकीय दूध डेअरीची जागा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचा धक्कादायक प्रकार उघड!

पुणे, दि ७

बोपोडी परिसरातील शासकीय दूध डेअरीची जागा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांमध्ये प्रचंड संताप आहे.

सरकारी मालमत्तेवर खासगी स्वार्थासाठी डल्ला मारला जात असल्याची ही घटना पुणे शहरातील महसूल विभागातील भ्रष्ट आणि बेजबाबदार कारभाराचे आणखी एक उदाहरण ठरत आहे.

दरम्यान, पुणे शहराचे तहसीलदार श्री. यवले यांना निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी स्वतः चौकशी करून यवले यांच्या विरोधात कारवाईची शिफारस केली, त्यानुसार महसूल विभागाने या संदर्भातील निलंबन आदेश जारी केला असून, त्याची पुष्टी प्मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर, दूध डेअरीच्या जमिनीवरील संशयास्पद व्यवहार आणि त्यात संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

ही जागा अनेक वर्षांपासून शासकीय डेअरी प्रकल्पासाठी राखीव होती. मात्र, काही प्रभावशाली लोकांनी संगनमताने ही जमीन खासगी नावे करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची माहिती समोर आली आहे.
ही केवळ भ्रष्टाचाराची नव्हे, तर जनतेच्या मालमत्तेवर डल्ला मारण्याची धक्कादायक घटना आहे.

मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या वतीने आम्ही या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करतो.

मी, अनवर शेख, संचालक — मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन, प्रशासनाकडे पुढील ठोस मागण्या करतो

👉 या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि सार्वजनिक चौकशी करण्यात यावी.
👉 डेअरीची जागा जर खासगी नावे झाली असेल, तर ती तात्काळ शासकीय नावे परत मिळवावी.
👉 संबंधित सर्व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी.
👉 भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जमिनींच्या नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणावी.

सरकारी मालमत्ता ही जनतेची असते, आणि तिचा उपयोग सार्वजनिक हितासाठीच झाला पाहिजे.
प्रशासनातील काही मोजक्या व्यक्तींमुळे संपूर्ण यंत्रणेचा विश्वास ढासळतो — हे थांबवण्यासाठी आता कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे.

✍️ अनवर शेख
संचालक — मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन, पुणे
(सामाजिक कार्यकर्ता | भ्रष्टाचाराविरोधात आणि जनहितासाठी लढणारा आवाज)
मॉब 8459867838. KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *