बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील ३ आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. गुन्हे शाखेने दोन संशयितांना नागपूर मधून ताब्यात घेतले तसेच बोपदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कोंढव्यातील येवलेवाडी परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आले. सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील ४० गावे, वाड्या, वस्तींवरील ४५० सराइतांची चौकशी केली. पुणे जिल्ह्यातील घाट, तसेच टेकड्यांच्या परिसरात लूटमार, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराइतांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.अखेर तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यांची सखोल चौकशी सुरू आहे
ML/ML/PGB
11 Oct 2024