देशातील पहिल्या दोन सिलेंडर असलेल्या कारची बुकींग सुरू
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क): जास्त मायलेज देणाऱ्या सीएनजी सध्या ट्रेंडींग आहेत. पण परंतु सर्वच पेट्रोल पंपांवर CNG गॅस उपलब्ध नसल्यामुळे काहीवेळा गैरसोय होऊ शकते. यावर उपाय वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या टाटा कंपनीने दोन सिलिंडर असलेली बाजारात आणली आहे.
Tata Motors ने भारतीय बाजारपेठेत आपली Tata Altroz CNG कार (Tata Altroz iCNG) बुक करणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे ही भारतातील पहिली कार आहे जी ट्विन सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञानासह आणली गेली आहे. ग्राहक ही कार २१,००० मध्ये बुक करू शकतात. मे २०२३ पासून या कारची विक्री सुरु केली जाणार आहे.
Tata Altroz ही भारतातील सर्वात सुरक्षित प्रीमियम हॅचबॅक आहे, जी आता पेट्रोल आणि डिझेल व्यतिरिक्त CNG अवतारात खरेदी केली जाऊ शकते. यासह, सीएनजीसह उपलब्ध असलेली टाटाच्या पोर्टफोलिओमधील ही चौथी कार आहे. याआधी कंपनी सीएनजी अवतारात टाटा टियागो, टाटा टिगोर आणि टियागो एनआरजी देखील विकत आहे.
सीएनजी कारमध्ये अनेकदा बूट स्पेस संपण्याची समस्या असते. कारला मागील बाजूस ६०-लिटरचा CNG सिलेंडर मिळतो, ज्यामुळे सर्व बूट स्पेस त्यात जाते. अशा परिस्थितीत टाटा मोटर्सने ट्विन सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञान आणले आहे. या अंतर्गत, एका मोठ्या सिलेंडरचे दोन भाग केले जातात. टाटाने आपल्या कारमध्ये ३०-३० लिटरचे दोन सीएनजी सिलिंडर दिले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना चांगली बूट स्पेस मिळणार आहे.
SL/KA/SL
21 April 2023