देशातील सर्वांत स्वस्त इलेक्ट्रीक कारचे बुकींग सुरू
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इलेक्ट्रीक वाहनांच्या वाढत्या ट्रेंडमध्ये आता विविध कंपन्या आपल्या गाड्या बाजारात दाखल करत आहेत. एमजी मोटर इंडियाने आतापर्यंतची सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार कॉमेट ईव्हीची आता भारतीय मार्केटमध्ये आणली आहे. हीचे बुकींग कालपासून सुरू झाले आहे. पुढील काही दिवसात एमजी कॉमेट ईव्हीची डिलिव्हरी सुरू होणार आहे. केवळ ७.९८ लाख रुपयाच्या इंट्रोडक्टरी किंमतीत सुरुवातीच्या ५ हजार ग्राहकांना मिळणार आहे.
बहुधा यानंतर एमजी आपल्या स्वस्त इलेक्ट्रिक कारच्या किंमतीत वाढ करू शकते. तुम्ही या कारला ११ हजार रुपयाच्या टोकन अमाउंटवर बुक करू शकता. एमजी मोटर सिटी राइडसाठी आणलेल्या कॉमेट ईव्ही सोबत ८ वर्ष किंवा १ लाख २० हजार किमी पर्यंत बॅटरी वॉरंटी मिळत आहे. MG Comet EV Booking Opens
सध्या एमजी कॉमेट ईव्हीच्या सर्व व्हेरियंट आणि त्याच्या किंमती संबंधी एन्ट्री लेवल कॉमेट ईव्ही पेस (MG Comet EV Pace) व्हेरियंटची किंमत ७.९८ लाख रुपये, MG Comet EV Play ची किंमत ९.२८ लाख रुपये आणि MG Comet EV Plush व्हेरियंटची किंमत ९.९८ लाख रुपये आहे.
विशेष म्हणजे एमजी मोटर इंडियाने आपल्या कॉमेट ईव्हीला इंडस्ट्री फर्स्ट ट्रॅक एन्ड ट्रेस फीचर सोबत आणले आहे. ज्यात तुम्ही बुकिंग पासून डिलिव्हरी पर्यंत संपूर्ण प्रोसेसला MyMG अॅपवर पाहू शकता. ग्राहक फोनवरून बुकिंगची माहीती जाणून घेऊ शकतात.
SL/KA/SL
16 May 2023