बुकी अनिल जयसिंघानीला हायकोर्टानं दिला झटका

 बुकी अनिल जयसिंघानीला हायकोर्टानं दिला झटका

मुंबई दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क):राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावले व ब्लॅकमेल प्रकरणातील आरोपी बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई हायकोर्टानं झटका दिला आहे .
अनिल जयसिंघानी याची जामीन याचिका फेटाळली आहे.मात्र त्याचा चुलत भाऊ निर्मल जयसिंघानी याला मात्र 30 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.
अनिल जयसिंघानी आणि निर्मल जयसिंघानी हे दोघे बुकी असून अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. अनिल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांनी २० मार्च रोजी गुजरातमधून अटक केली होती. यापूर्वी जयसिंघानीची मुलगी आणि सहआरोपी अनिक्षा जयसिंघानी हिची जामिनावर नुकतीच सुटका झाली आहे.
मलबार हिल पोलिसांत २० फेब्रुवारी रोजी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी या दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये अनिक्षाने अमृता फडणवीस यांना काही कथीत ऑडिओ क्लीप सार्वजनिक करण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, अॅड. अजय मिसर यांनी अनिल जयसिंघानीच्या जामीनाला विरोध करता संपूर्ण कट कारस्थान अनिल जयसिंघानीसाठी रचलं गेल्याचं कोर्टाला सांगितलं. अमृता फडणवीस यांनी आपल्या तक्रारीतही म्हटलं होतं की, अनिक्षा हीन तिच्या वडिलांविरोधातील प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी त्यांना लाच देण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीडी अल्माले यांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर अनिल जयसिंघानीची याचिका फेटाळली. पण दुसरा आरोपी निर्मल जयसिंघानी याचा जामीन मंजूर केला.

SW/KA/SL

1 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *