बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी आणि ब्लॅकमेल केल्या प्रकरणी अटकेत असलेली डिझायनर अनिक्षा हीचे वडील क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानीला पोलीसांनी गुजरातमधून अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अनिल जयसिंघानीला घेऊन पोलिस मुंबईत दाखल होणार आहेत.
अनिल जयसिंघानी याचे देशभरातील राजकीय नेते आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अनिल जयसिंघानी यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये पोलीस अनिल जयसिंघानी यांचा शोध सुरु होता.
SL/KA/SL
20 March 2023