पाटणा बुक फेअरमध्ये पुस्तकाची किंमत तब्बल 15 कोटी
पाटणा, दि. ९ : ४१ व्या पाटणा बुक फेअरमध्ये ‘मैं’नावाचे पुस्तक सर्वाधिक चर्चेत आहे. या पुस्तकाची किंमत 15 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.संपूर्ण जगात या पुस्तकाच्या केवल तीनच प्रती असल्याचे म्हटले जात आहे. पाटणा बुक फेअरमध्ये या पुस्तकाला मोठ्या भव्य पद्धतीने प्रदर्शित करण्यात आले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पुस्तकाची पाने उलटण्याची परवानगी कोणाला नव्हती. यामुळे लोकांची उत्सुकता आणखीनच चाळवली गेली आहे.
’मैं’ पुस्तकाचे लेखक रत्नेश्वर यांचा दावा आहे की 408 पानांचे हे पुस्तक त्यांनी केवळ 3 तास 24 मिनिटांत लिहिले आहे. त्यांच्या मते 6 आणि 7 सप्टेंबर 2006च्या दरम्यानच्या रात्री ब्रह्ममुहूर्तावर लिहिताना त्यांना आध्यात्मिक जागरण आणि ‘ब्रह्मलोक यात्रा’चा अनुभव झाला. त्याच अनुभवाला त्यांनी शब्दात व्यतित करीत हा ग्रंथ लिहिला आहे. या पुस्तकात एकूण 43 अध्याय आहेत. आणि लेखकाचे म्हणणे आहे की मानवाच्या मानण्याच्या ते जाणण्याच्या प्रवासाला समजवते.
लेखकाचे म्हणणे आहे की सध्या या पुस्तकाच्या तीन प्रती तयार केल्या आहेत. त्यांची इच्छा केवळ 11 विशेष लोकांना हे पुस्तक सोपवायाचे आहे. ते अशा लोकांच्या शोधात आहेत, ज्यांना हे ज्ञान समजू शकेल. हे पुस्तक हिंदीमध्ये लिहिले असून याची इंग्रजी आवृत्ती देखील लाँच केली आहे. इंग्रजी भाषांतर कनिष्का तिवारी यांनी केले आहे. इंग्रजी आणि हिंदी दोन्ही आवृत्तीची किंमत समान 15 कोटी रुपये ठेवली आहे.
SL/ML/SL