धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर
नागपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी पंधरा हजाराचा बोनस देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली, विदर्भ मराठवाडा भागातील पश्र्नांवर सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते.
या बोनसचा फायदा पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना होईल आणि तो त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाची पुन्हा स्थापना करण्यात येत आहे त्यालाकेंद्राची मान्यता लवकरच येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. समृद्धी महामार्ग गडचिरोली पर्यंत राज्यात आणि पलीकडे मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड ला जोडत आहोत, लोणार सरोवराच्या विकास योजनेला मान्यता देण्यात आली आहे , भविष्यात उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात विदर्भात क्रांती झालेली दिसेल , विदर्भ मराठवाडा टुरिझम सर्किट तयार करण्यात येत आहे, धार्मिक पर्यटन ही वाढलेलं दिसेल असे शिंदे यांनी सांगितले.
गोसीखुर्द इथे शंभर एकरवर जागतिक पर्यटन केंद्र करण्यात येत आहे .गडचिरोली जिल्ह्यात तीन लोह प्रकल्प, त्यातून दहा हजार लोकांना रोजगार मिळेल , नक्षलवाद मोडून तोडून काढू आणि तिथले प्रकल्प मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी दिली. विदर्भातील खनिज उद्योगाला चालना देण्यासाठी नवीन खनी कर्म धोरण तयार करण्यात येईल.
संभाजीनगर इथे संत्रा मोसंबी प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे .विस्तारित पेंच नदी प्रकल्पाला सुधारित मान्यता देण्यात येत आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नानाजी कृषी संजीवनी योजना टप्पा दोन सहा हजार कोटींचा असून त्याला मान्यता मिळाली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ML/KA/SL
29 Dec. 2022