दीपावली – २०२५ साठी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

 दीपावली – २०२५ साठी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई, दि १५
बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दीपावली – २०२५ प्रीत्यर्थ ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.

दीपावली – २०२५ करीता महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱयांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी घोषित केला आहे. त्याचा क्रम, तपशील आणि सानुग्रह अनुदान रक्कम महानगरपालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,००० रु तर अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारीः रुपये ३१,०००/- तसेच महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकः रुपये ३१,०००/- तर माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/- तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/- तर अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-
तर अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-
तसेच सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV): भाऊबीज भेट रुपये १४,०००/- तर बालवाडी शिक्षिका / मदतनीस – भाऊबीज भेट रुपये ०५,०००/- देय असेल
महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, माननीय उप मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, माननीय उप मुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *