दिवाळी सणापूर्वी ५०,००० बोनस आणि इतर मागण्यांसाठी १५ आक्टोबर २०२५ रोजी महापालिका मुख्यालयावर विशाल मोर्चा !

मुंबई, दि १५
मुंबई महापालिका कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कोरोनासारख्या महाभयंकर साथीमधील सेवा, कोल्हापूर, सांगली, महाड सारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये धाऊन जाणारा म.न.पा. कामगार, तसेच ६० हजारांपेक्षा रिक्त पदे असतानाही बृहन्मुंबई क्षेत्रातील नागरिकांची इमाने-इतबारे अविरत देत असलेली सेवा त्याचप्रमाणे साठ हजार रिक्त पदे असतानाही सध्या कार्यरत कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी बजावलेले कर्तव्य आणि वाढती महागाई हे लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेतील सर्व कामगार, कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, परिचारिका, परिसेविका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अग्नीशमन दलातील कर्मचारी इत्यादी कायम कामगारांबरोबर महानगरपालिकेतील विविध खात्यातील कंत्राटी, रोजंदारी कामगार, बहुउद्देशीय कामगार, आरोग्य खात्यातील कंत्राटी कामगार, सी.टी.सी. बोरीवली रुग्णालयातील कर्मचारी, आर.सी. एच.२, एनयुएचएम कर्मचारी, मुंबई एड्स कंट्रोल सोसायटी कर्मचारी, बालवाडी शिक्षिका व मदतनीस, अंशकालिक कर्मचारी, स्वच्छ मुंबई अभियान मधील कंत्राटी कामगार, सर्व समग्र शिक्षा अभियान कर्मचारी, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कर्मचारी तसेच आरोग्य खात्यातील स्वयंसेवी आरोग्यसेविका (सी.एच.व्ही.) यांना किमान ५०,००० बोनस /सानुग्रह अनुदान दिवाळी सणापूर्वी देण्यात यावा अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष श्री. अशोक जाधव यांनी केली आहे.
बोनस मागणी बरोबरच कामगार, कर्मचारी, अधिकारी यांची भरती प्रक्रिया सुरू झाली उदा. पी.टी. प्रकरणे /आयटी अॅप्रन्टशीप / भरती प्रक्रिया या अन्वये दि. ५ मे २००५ पूर्वी सुरू झाली व दि. ५ मे २००८ नंतर महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले अशा कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी तसेच सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, बायोमॅट्रीक हजेरी प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटींमुळे होत असलेल्या ANM मुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसुल करण्याबाबतचे प्रसारित केलेले परिपत्रक स्थगित करण्यात यावे, वैद्यकिय गटविमा योजनेमध्ये असलेल्या त्रुटी दूर करून सर्व कामगार कर्मचाऱ्यांना ५ लाख कॅशलेस विमा योजना कोणत्याही प्रकारच्या अटी-शर्ती व कॅपिंग न करता कायमस्वरूपी लागू करण्यात यावी. कामगार, कर्मचाऱ्यांची त्वरित भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी तसेच भरतीमध्ये कामगारांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात यावे, घ.क.व्य. खात्यातील कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावी. घ.क.व्य. खात्यातील कामगारांच्या वारसांना शिक्षणाप्रमाणे नोकऱ्या देण्यात यावा तसेच घाणकाम भत्ता मिळणाऱ्या ड्रेनेज, मलनिःसारण, पंपिंग, प.ज.वा., मलेरिया, देवनार पशुवधगृह, बाजार, रुग्णालये व परिवहन खात्यातील सेवानिवृत्त कामगार यांना त्वरित वारसा हक्क नोकरी देण्याबाबत परिपत्रक काढावे ह्या मागणीकरीता म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई संघटनेच्यावतीने बुधवार दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वा. म.न.पा.तील सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी यांचा विशाल मोर्चा महापालिका मुख्यालयावर घेऊन जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष श्री. अशोक जाधव, सरचिटणीस श्री. वामन कविस्कर आणि कार्याध्यक्ष श्री. यशवंतराव देसाई यांनी दिली.KK/ML/MS