बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात खून

कोल्हापूर दि २– १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याचा आज कळंबा कारागृहात खून करण्यात आला आहे.

आज सकाळी साडेसात वाजण्याचे सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला असता त्याच्या डोक्यात लोखंडी झाकण घालून त्याचा खून करण्यात आला आहे.

न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार , सौरभ विकास सिद्ध या पाच जणांनी
ड्रेनेज वरील लोखंडी झाकणाने त्याला मारहाण केली , त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याचा जागीच मृत्यू झाला.

जुना राजवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *