मुंबई विद्यापीठाने दिक्षांत समारंभात दिली चुकीच्या नावाने प्रमाणपत्रे

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सात जानेवारी रोजी मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला. ज्यात पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. 2023-24 बॅचच्या पदवीधर विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रमाणपत्रावर ‘मुमाबाई विद्यापीठ’ असे लिहिलेले असल्याचे निदर्शनास आले. दीक्षांत समारंभात मुंबई विद्यापीठाने ‘मुंबई’ असे चुकीचे स्पेलिंग असलेल्या पदव्या प्रदान केल्या. या पदवी प्रमाणपत्राबाबत अनेक महाविद्यालयांमधून प्रकरणे समोर आली आहेत. अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाला परत पाठवले. मुंबई विद्यापीठाने प्रमाणपत्रावर इंग्रजीत ‘मुंबई’ ऐवजी ‘मुमाबाई’ लिहिले आहे. मुंबई विद्यापीठाने दीक्षांत समारंभात सर्व विद्यार्थ्यांना ‘मुमाबाई’ लिहिलेली पदवी प्रमाणपत्र वाटली. ज्यामुळे एकच गोंधळ उडाला.
मुंबई विद्यापीठाने हैदराबाद येथील एका कंपनीला प्रमाणपत्रे छापण्याचे काम दिले होते. छपाईच्या समस्येमुळे काही प्रमाणपत्रांमध्ये चुका झाल्या, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना दिली. किती प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी होत्या याची आकडेवारी त्यांनी दिली नाही. दरम्यान ‘आम्ही त्यात सुधारणा करत असल्याचेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता नवीन प्रमाणपत्रे मिळतील. सध्या विद्यापीठ प्रमाणपत्र सुधारण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
1 March 2025