मुंबई उच्च न्यायालयाचा पालिकेला दणका

 मुंबई उच्च न्यायालयाचा पालिकेला दणका

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दादर म्हणजे खेळाचे पंढरी अशी क्रीडा प्रेमींची मान्यता आहे. मात्र दादर दादासाहेब फाळके रोडवर असलेले दोन हजार चौरस मीटर खेळाचे मैदान पालिका प्रशासनाच्या जाणीवपूर्वक चुकीमुळे विकासकाच्या घशात घालण्यात आल्याचा आरोप पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा Leader of Opposition Ravi Raja यांनी केला आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दणका दिला असून राज्य सरकारला आरक्षण रद्द करण्यास सांगितले आहे. परंतु खेळासाठी आरक्षित असलेले मैदान राज्य सरकारने ताब्यात घेत खेळासाठी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्याचे ते म्हणाले.Bombay High Court hits the municipality

पालिकेच्या विकास नियोजन आराखड्यानुसार दादर येथील दादासाहेब फाळके रोडवर असलेले मैदान खेळासाठी आरक्षित होते. आरक्षित खेळाचे मैदान ताब्यात घेण्यासाठी खरेदी नोटीस बजावण्यात आली होती. तसेच भूखंड ताब्यात घेण्यासाठी २०१२ – १३ मध्ये सुधार समिती व सभागृहात मंजुरी मिळाली होती. भूखंड ताब्यात घेण्यासाठी पालिकेने जमीन मालकाला ८ कोटी ५१ लाख रुपये देणे होते. मात्र पालिका प्रशासनाने विकासकाच्या फायद्यासाठी दुर्लक्ष केले आणि १५० कोटींचे दोन हजार चौरस मीटरचा भूखंड विकासकाच्या घशात घातल्याचा आरोप पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. दरम्यान, खेळाचे मैदान कायम रहावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचे ते म्हणाले.

ML/KA/PGB
12 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *