हे आहेत सर्वांधिक कर भरणारे बॉलिवूड कलाकार

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवुडचे बीग बी अमिताभ बच्चन आज ८२ व्या वर्षीही स्टार अभिनेत्यांना भारी ठरत आहेत. पिंकव्हिलाच्या एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल १२० कोटी रुपये कर भरला आहे. वर्षभरातील त्यांची एकूण कमाई ३५० कोटी रुपये होती. त्यांनी चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करून ही कमाई केली आहे. ते वयाच्या ८२ व्या वर्षी सिनेविश्वात सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींपैकी एक ठरले आहेत.
अमिताभ बच्चन आता शाहरुख खानला मागे टाकून सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी ठरले आहेत. मागच्या वर्षी, शाहरुखने अंदाजे ९२ कोटी रुपये कर भरला होता. पण यंदा अमिताभ यांनी तब्बल १२० कोटी रुपये कर भरून शाहरुखला मागे टाकलं आहे.
SL/ML/SL18 March 2025