बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती…

 बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती…

जालना, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यात स्वीप कार्यक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, बस स्थानक यासह सार्वजनिक ठिकाणी बोलक्या बाहुल्याच्या सहाय्याने पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती केली जातेय.

आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वीप अंतर्गत निवडणूक विषयक जनजागृती करण्यात आली. बोलक्या बाहुल्यांच्या पथनाट्यातून जिल्हाभरात ठीक ठिकाणी मतदान विषयक जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी बोलतांना प्राथमिक शाळेचे शिक्षक जय डोले म्हणालेत. यावेळी बोलक्या बाहुल्यांच्या पथनाट्यातून जय प्रभू ढोले यांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच मतदानाचे महत्त्व सविस्तर पटवून दिले आणि दिव्यांगांसाठी असलेली मतदानाची सुविधा सविस्तर समजावून सांगितली.

निवडणुकीच्या माध्यमातून देशाची लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी आपले मत योग्य उमेदवारास देणे महत्त्वाचे आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरिक तरुण तरुणींमध्ये जनजागृती केली. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघाकरता दुसऱ्या टप्प्यातील म्हणजे 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे तर जालना लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो असे सांगून मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी कैलास दातखिळ यांनी दिलीय. या लोकसभा निवडणुकीत 100% मतदान होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावात आणि वाडी वस्तीवर बोलक्या बाहुल्यांचा नाट्यप्रयोग या अंतर्गत होत आहे. या दरम्यान तालुक्यातील लग्न सोहळ्यात उपस्थित वराडी मंडळींना देखील जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती जय ढोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. अशा प्रकारचे अनोखे प्रयोग राबवून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रमांवर जिल्हा प्रशासन भर देत आहे.

ML/KA/PGB 8 APR 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *