बोकड बाजार फुलले गर्दीने

चंद्रपूर दि २१:- चंद्रपूर जिल्ह्यातील टेमुर्डा इथे आज पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मोठा बोकड बाजार भरलाय. विदर्भातील सर्वात मोठा असलेला हा बाजार आज लोकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे. टेमुर्डा हे गाव वरोरा तालुक्यात असून, इथे दर गुरुवारी हा बाजार भरतो. या बाजारात राज्य आणि तेलंगणातून बोकड विक्रीसाठी आणले जातात. नुकताच श्रावण महिना संपला आणि 23 तारखेला पाडवा आला.
त्यामुळे शौकिनांनी आणि मांस विक्रेत्यांनी बोकड खरेदीसाठी आज मोठी गर्दी या बाजारात केली आहे.
उस्मानाबादी बोकडापासून तर गावठी आणि फार्ममधील बोकड इथे विक्रीसाठी आणले गेले. दोन हजारांपासून 30 हजारांपर्यंत बोकडाच्या किमती आहेत. केवळ कापण्यासाठीच नाही, तर व्यवसायासाठीसुद्धा या बाजारातून बोकड आणि शेळ्यांची विक्री इथे होत असते. पण आज भरलेला बाजार हा पाडव्याच्या पार्श्वभूमीवर आल्याने गर्दी अधिक झाल्याचे बघायला मिळाले. या बाजारातील सर्व व्यवहार हे रोखीने होत असून, कोट्यवधींची उलाढाल यातून होते. एकाच बाजारात सर्व प्रकारचे बोकड मिळत असल्याने खरेदीदार पण विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. ML/ML/MS