बोगस दहीहंडी असोसीएशन विरोधात आंदोलन
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दहीहंडी उत्सव २७ ऑगस्टला सर्वत्र उत्सवात साजरा होत असताना ” महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसीएशन ” ने अद्यापही गोविंदांना विमा कवच दिले नाही. तीन महिन्यांपूर्वी मागील दाराने हे गोविंदा असोसीएशन स्थापन झाले आहे ते नियमबाह्य आहे. या असोसीएशन ला विमा कंपनीच्या माध्यमातून सरकार आता ७५ लाख रुपये देणार आहे. मात्र धर्मादाय आयुक्त यांनी नवीन संस्थेला नोंदणी देताना नियमांना व कायद्याला बगल दिली आहे. असा आरोप असोसीएशन चे अध्यक्ष अरुण पाटील यांनीमुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावर्षी ७५,००० ( पंच्याहत्तर हजार ) गोविंदांचा इन्शुरन्स जाहीर केला आहे. परंतु १८ दिवस शिल्लक असताना अजून सुद्धा गोपाळांचे इन्शुरन्स काढण्यात आलेला नाही. सन २०२३ ला शासनातर्फे दहीहंडी समन्वय समितीच्या नावे जीआर काढला होता. यावर्षी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन यांच्या नावे जीआर काढल्यामुळे सर्व गोविंदा पथकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे प्रमुख सल्लागार गुरू गौरव शर्मा यांनी सांगितले.
नवीन असोसिएशन कधी व केव्हा स्थापन झाले हे गोविंदा पथकांना माहिती नाही. धर्मदाय आयुक्त कार्यालयात नियमबाह्य नोंदणीकृत करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणी रद्द करावी अन्यथा येत्या दोन दिवसात धर्मदाय आयुक्त वरळी कार्यालयावर गोविंदा पथक आंदोलन करणार असे सचिव कमलेश भोईर यावेळी सांगितले.
SW/ML/PGB
9 Aug 2024