20वा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक चॅंटिंग समारोह बोधगया येथे 2 ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान होणार आयोजन

मुंबई, दि १३ :
या वर्षीचा 20वा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक चैटिंग समारोह प्रथमच महाबोधी महाविहार परिसरात, बोधगया येथे 2 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडणार आहे. यामध्ये जगभरातून बौद्ध उपासक-उपासिका आणि भिक्षु सहभागी होतील.हे आयोजन लाइट ऑफ बुद्धधर्म फाउंडेशन इंटरनॅशनल (LBDFI) द्वारा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक सुत्तपाठ परिषद (ITCC) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. या दोन्ही संस्थांचा उद्देश तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणींचा प्रसार संपूर्ण जगभर करणे हा आहे, जो जागतिक बौद्ध एकतेचे प्रतीक ठरेल.
मुंबई प्रेस क्लबमध्ये येथे आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत आय टी सी सीचे अध्यक्ष भंते संघसेना (लेह), सचिव भंते विनय रक्खिता, उपाध्यक्ष भंते अग्रधम्मा (अरुणाचल प्रदेश) आणि कोषाध्यक्ष भिक्षुणी अय्या धम्मदीना यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या अगोदरचे 19 समारोह कंबोडिया, श्रीलंका, म्यानमार, लाओस, थायलंड, व्हिएतनाम आणि अमेरिका यासारख्या देशांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. भारताला प्रथमच याचे यजमानपद मिळाले असून, हा आपल्या देशासाठी अभिमानास्पद क्षण आहे.
या 10 दिवसीय समारोहा मधे बोधिवृक्षाच्या सान्निध्यात दररोज बुद्ध वचनांचे वेगवेगळ्या पदांचे पठण केले जाईल, बौद्ध धर्मगुरूंचे प्रवचन, प्रश्नोत्तर सत्र, आर्ट गॅलरी, देश-विदेशातील कलाकारांची सांस्कृतिक सादरीकरणे आणि विचार-प्रसार व सांस्कृतिक देवाण-घेवाण यांचा समावेश असेल.
या कार्यक्रमात भारतातून सुमारे 20,000 उपासक-उपासिका आणि परदेशातून 5,000 हून अधिक बौद्ध उपासक, भिक्षु व भिक्षुणी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून सुमारे 10,000 श्रद्धावान उपासक-उपासिका आणि 500 वालंटियर्स या समारोहा मधे सहभागी होतील.
2024 मध्ये 27 देशांतून 12,000 पेक्षा अधिक लोकांचा सहभाग होता.
मागील वर्षी 27 देशांतून 12,000 पेक्षा अधिक उपासक-उपासिकांनी नोंदणी केली होती. यामध्ये नेपाळ, लाओस, स्वीडन, बांगलादेश, म्यानमार, लाटविया, नाउरू, श्रीलंका, इंडोनेशिया, कोलंबिया, कोरिया, चीन, कॅनडा, फ्रान्स, तैवान, जर्मनी, मलेशिया आदी देशांचा समावेश होता. या वर्षी ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.KK/ML/MS