या राज्यात AI तपासणार बोर्डाचे पेपर

 या राज्यात AI तपासणार बोर्डाचे पेपर

चंडीगढ़दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

सर्वच क्षेत्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्स अर्थात AI’या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. आता तर विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे उत्तरपत्रिका एआय टेक्नॉलॉजी वापरून तपासण्यात येणार आहेत. हरियाणा बोर्ड एआयच्या मदतीनं शिक्षण क्षेत्रात नवीन उपक्रम राबवणार आहे. पुढील वर्षापासून म्हणजेच 2025 पासून एआयच्या मदतीने बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासल्या जाणार आहेत. जर सर्व काही नियोजनानुसार झाले, तर या वेळी हरियाणा बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाला उशीर होणार नाही. विशेष म्हणजे देशात प्रथमच एआयच्या माध्यमातून मूल्यमापन प्रणाली बोर्डामार्फत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मार्चमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांच्या मार्किंगबरोबरच निकालही वेळेत जाहीर होण्यास मदत होईल. शिवाय उत्तरपत्रिका तपासताना चुका होण्याचा धोकाही कमी होईल, असा दावा केला जातोय.

हरियाणा बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनचे अध्यक्ष डॉ.व्ही. पी. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मार्च 2025 मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांचे मार्किंग एआयच्या माध्यमातून केलं जाईल. नवीन सिस्टिममध्ये उत्तरपत्रिकेत लिहिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे सॉफ्टवेअर सांगेल. त्या आधारे गुणही दिले जातील. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन एआयद्वारे केले जाईल आणि शिक्षक त्याची तपासणी देखील करतील. यानंतर दोन्हीमधील मार्किंगची तुलना केली जाईल.अनेकदा उत्तरपत्रिका तपासताना हलगर्जीपणा केल्याचा आरोपही शिक्षकांवर होतो. मात्र एआयद्वारे उत्तरपत्रिका तपासल्यानंतर शिक्षकांनी दिलेले गुण योग्य आहेत की नाही, हे देखील सॉफ्टवेअर ठरवू शकणार आहे.

या सिस्टिममध्ये परीक्षेनंतर उत्तरपत्रिका स्कॅन केल्या जातील. सर्व जिल्ह्यांतील शिक्षकांची पथके विषयनिहाय हे काम पूर्ण करतील. त्यानंतर ऑनलाइन मार्किंग होईल. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लेखी उत्तरांना गुण दिले जातील. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम वेळेत पूर्ण होईल. ऑनलाइन मार्किंगसाठी शिक्षकांकडे यूजर आयडी आणि पासवर्ड असेल, त्याद्वारे ते मूल्यमापन केंद्रावर उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासतील. उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन केव्हा सुरू झाले व कधी बंद झाले, याचीही नोंद केली जाणार आहे. तसेच उत्तरपत्रिका तपासल्यानंतर प्रत्येक प्रश्नाच्या एकूण गुणांचीही आपोआप नोंद होईल. या यात उत्तरपत्रिकेचं एखादं पान तपासायचं राहिलं, तर शिक्षकाला तत्काळ इंडिकेशन दिले जाईल.

SL/ ML/ SL

6 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *