BMW ची सर्वात स्वस्त कार भारतात लाँच

मुंबई,दि. १८ : BMW इंडियाने आज भारतीय बाजारात बीएमडब्ल्यू २ सिरीज ग्रॅन कूपचे अपडेटेड मॉडेल लाँच केले आहे. दुसऱ्या पिढीची ही कार सध्याच्या मॉडेलपेक्षा मोठी आहे आणि नवीन वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. सुरक्षेसाठी ट्रॅक्शन कंट्रोल आणि लेव्हल-२ अडास सारखी वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने ही कार २१८एम स्पोर्ट आणि २१८एम स्पोर्ट प्रो या दोन प्रकारांमध्ये सादर केली आहे. तिची एक्स-शोरूम किंमत ४६.९० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे. तिची बुकिंग आणि डिलिव्हरी सुरू झाली आहे. ती मर्सिडीज-बेंझ ए क्लासशी स्पर्धा करते.
नवीन २ सिरीजमध्ये १.५-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, तर जुन्या मॉडेलमध्ये अधिक शक्तिशाली २-लिटर टर्बो-पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा पर्याय होता. कंपनीचा दावा आहे की, ते फक्त ८.६ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते.
BMW ने अपडेटेड २ सिरीज ग्रॅन कूपला नवीन शार्क-नोज डिझाइन दिले आहे, ज्यामुळे ती स्पोर्टी बनते. कारमध्ये काळ्या रंगाची किडनी ग्रिल आहे, जी पूर्वीपेक्षा लहान आणि स्टायलिश आहे. त्यात ‘आयकॉनिक ग्लो’ वैशिष्ट्य आहे. म्हणजेच, ग्रिलमध्ये एक विशेष प्रकारची प्रकाशयोजना आहे जी रात्रीच्या वेळी ती आणखी आकर्षक बनवते.
SL/ML/SL