महापालिकेच्या सेवानिवृत्तांचे स्नेहसंमेलन ; विविध कार्यक्रमांची रेलचेल

 महापालिकेच्या सेवानिवृत्तांचे स्नेहसंमेलन ; विविध कार्यक्रमांची रेलचेल

मुंबई, दि. 26 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे द्वितीय स्नेहसंमेलन मुलुंड, पूर्व येथील संभाजी राजे सांस्कृतिक हॉल येथे नुकतेच संपन्न झाले. अतिशय उत्तम प्रतिसादात संपन्न झालेल्या या स्नेहसंमेलनास महिला वर्गाची उपस्थिती आणि त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग लक्षणीय होता.*
अनौपचारिकरित्या संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर रवी मोरे, प्रकाश मोरये, विजय पाताडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गाण्यांचे सादरीकरण केले. नांदी, लोकगीते असा पूर्णतः मराठी बाज असलेल्या गाण्यांमध्ये वारकरी, वासुदेव, गावागावांमध्ये फिरून कुंकू, टिकल्या, फणी, काळेमणी विकणारी बाई आणि तिचे बुरगुंडा हे ख्यातनाम लोकगीत, साईबाबा, कोळी नृत्य यांमुळे कार्यक्रम आकर्षक झाला. गाण्यांच्या तालावर थिरकतांना महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी वय, व्याधी, समस्या सर्व काही विसरले होते.
यावेळी श्रीमती सुषमा भागवत यांचा पुरस्कार प्राप्त लघु चित्रपट ‘होळी रे होळी’ दाखविण्यात आला. त्यानंतर श्रीमती सुषमा भागवत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मराठमोळ्या सणांचे महात्म्य दर्शविणारी उदबोधक अशी नृत्यनाटिका सादर केली. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात श्री. योगेश जोशी यांचा “हसू आणि आसू” हा एकपात्री कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती अलका जोशी व श्रीमती वंदना शिर्के यांनी ओघवत्या शैलीत सुंदररित्या केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. संजय मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
KK.MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *