भटक्या कुत्र्यांच्या मोजणीसाठी BMC वापरणार AI संख्या

 भटक्या कुत्र्यांच्या मोजणीसाठी BMC वापरणार AI संख्या

मुंबई, दि. १६ : सर्वोच्च न्यायलयाने काही दिवसांपूर्वीच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. देशातील सर्वांत महत्त्वाचे आणि दाटलोवस्तीचे शहर असलेल्या मुंबई मनपा क्षेत्रातील कुत्र्यांना शेल्टर हाऊसमध्ये स्थानांतरीत करण्याच्या कामी पालिका प्रशासन शिस्तबद्ध कारवाई हाती घेत आहे. मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिका प्रशासनाने एआय तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने भटक्या कुत्र्यांबाबतचा तपशील मिळू शकणार आहे. या प्रणालीचा वापर महापालिकेचे शेल्टरस, एनजीओ, पशु काळजीवाहक, पशू वैद्यक इत्यादींना एकत्र जोडण्यासाठी व भटक्या कुत्र्यांची माहिती गोळा करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

गोरेगाव पश्चिम येथे एका भटक्या कुत्र्यांने आठ ते दहा जणांवर हल्ला करत त्यांच्या चेहऱ्याचे, तोंडांचे लचके तोडले. त्यामुळे या हल्लेखोर भटक्या कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी दोन दिवस पी दक्षिण विभागासह पशु वैद्यकीय विभागाचे पथक तळ ठोकून होते. भटक्या कुत्र्यांची नसबंदी करूनही त्यांची संख्या आणि त्यांचा उपद्व्याप वाढत असला

भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्यानंतरही ही संख्या वाढत असल्याने या वाढत्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने एआय तंत्रज्ञान प्रणाली विकसित केली आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने या प्रणालीद्वारे १० हजार भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ महिन्यांच्या कालावधीसाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार असून पुढील तीन वर्षांची देखभाल करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग राबवला जाणार असून त्यासाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

स्माईल कौन्सिल बिझनेस इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून तयार होणारी विविध उत्पादने, सेवा व सुविधा यांना प्रोत्साहन देण्यासाठी निविदा न मागवता प्रायोगिक तत्त्वावर खरेदी व वापरात आणण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *