हळदीच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
वाशिम, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना हळदीला योग्य दर मिळत नसल्याच्या कारणावरून वाशिम बाजार समितीच्या समोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी हे हळदीला योग्य भाव देत नाहीत याउलट रिसोड, हिंगोली या ठिकाणी हळदीला सात हजार रुपयापर्यंत दर मिळत असताना वाशिममध्ये मात्र केवळ सहा हजार रुपयांनीच हळदीची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ नुकसान होत असून या विरोधात शेतकरी अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको साठी बसले होते. Block the way for farmers to increase the price of turmeric
जवळपास तासभर चाललेल्या या रास्तारोकोमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला.
ML/KA/PGB
20 May 2023