राख्यांची निर्मिती आणि विक्री करून अंध मुलांनी प्रशस्त केला उपजीविकेचा मार्ग.

वाशिम, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नियतीने अंधकारमय जीवन दिलेले असतांना मनामध्ये कुठलीही निराशा न ठेवता प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने राख्यांची निर्मिती करून वाशीम येथील चेतन सेवांकुरच्या १५ अंध मुलांनी राख्याची निर्मिती आणि विक्री करून कुणावरही विसंबून न राहता स्वबळावर आपल्या उपजीविकेचा मार्ग प्रशस्त केला आहे. Blind children pave way for livelihood by making and selling rakhis.
एकीकडे रोजगार नाही अथवा शेतात उत्पन्न नाही या कारणावरुन शिक्षित अशिक्षित लोक आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहेत. तर दुसरीकडे जन्मताच जीवनात अंधार असताना हिम्मत न हारता जिद्द, चिकाटी, परिश्रम तसेच जगण्याची उमेद बाळगून डोळसांना लाजविणारी कामगिरी चेतन उचितकर आणि त्याचे अंध सहकारी मित्र करीत आहेत.
सध्या सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मनोरंजन कार्यक्रम बंद असून या फावल्या वेळात आपल्या उपजिविकेकरिता काहीतरी उद्योग केला पाहिजे या कल्पनेतून त्यांना राख्या निर्मितीचा मार्ग सापडला. जीवनात कायमचा अंधार असतांना सुद्धा हिम्मत न हारता जिद्दीने त्यांनी १० हजार राख्या निर्मितीला सुरुवात केली.
वाशीम तसेच शेजारच्या जिल्ह्यातील शाळांमधून त्यांनी या राख्यांची स्वतः विक्री केली असून भरभरून प्रतिसाद या अंधांच्या डोळस कामगिरीला मिळत आहे. एकीकडे उत्पन्न आणि रोजगार नसल्याने हताश होऊन सुदृढ लोक सर्रास चुकीचा मार्ग निवडत असतांनाच अंध मुलांनी सुरु केलेल्या या धाडसी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ML/KA/PGB
30 Aug 2023