विकासक आणि पालिका अधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे इमारतीला आग
मुंबई, दि ११
दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी दहिसर येथील SRA इमारतीला विकासक व पालिका अधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे आग लागली, यात ४ ते ५ निष्पाप रहिवासीयांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
ही घटना अत्यंत गंभीर असून या विरोधात संभाजी ब्रिगेडचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांत गिरी यांनी आवाज उठवला असता बिल्डरचा पाळलेला स्थानिक गुंड रामेश्वर ठेंगे याने श्रीकांत गिरी यांना गोळी घालून मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे ही जिवे मारण्याची धमकी देणे अत्यंत निंदनीय निषेधार्ह बाब आहे. याचा जाब पोलिसांना विचारण्यासाठी दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांच्या नेतृत्वाखाली खालील शिष्टमंडळाने भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केला. ह्यावेळी
शिष्टमंडळात संभाजी ब्रिगेडचे मुंबई सचिव प्रमोद शिंदे, कार्याध्यक्ष शाहीद कुरेशी, संघटक अशोक गुप्ता, उपाध्यक्ष निशा शेख, मुंबई महिला आघाडी अध्यक्ष ॲड.रिया ताई करंजकर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष पुनम ताई शिंदे, उत्तर पश्चिम जिल्हा कार्याध्यक्ष महेश मोरे, प्रविण उघडे, राज गिरी, शंकर निर्वाण, सुरेश हेगडे, संतोष रावल, शत्रुघ्न विश्वकर्मा तसेच संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे युवावर्ग मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.KK/ML/MS