पाकिस्तानच्या बारा शहरात चौदा बॉम्बस्फोट

भारतीय सैन्यानं 6 मेला मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर आता पाकिस्तानात स्फोटांची मालिका सुरु झाली. कराची, रावळपिंडी, लाहोर, गुजरावालासह अनेक शहरांमध्ये स्फोट झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानात घबराट आहे. कराची सकाळच्या सुमारास स्फोट झाले. त्यानंतर आता अन्य शहरांमध्ये स्फोटांची मालिका सुरु झाली आहे.
लाहोरमध्ये झालेल्या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. अटकमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय रावळपिंडी, कराची, गुजरनवाला शहरांमध्येही बॉम्ब स्फोट झाले आहेत. या हल्ल्यांची जबाबदारी अद्याप तरी कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही. पाकिस्तानात एकूण १२ स्फोट झालेले आहेत. स्फोटांचे आवाज दूरवर ऐकू गेले. स्फोटांच्या मालिकेनंतर पाकिस्तानात हाय अलर्ट लागू करण्यात आलेला आहे.