फायरिंगचा सराव करताना स्फोट, दोन अग्नीवीर मृत्यूमुखी

 फायरिंगचा सराव करताना स्फोट, दोन अग्नीवीर मृत्यूमुखी

नाशिक, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये देवळाली कॅम्प येथे प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निविरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी फायरिंग रेंजमध्ये ‘आयएफजी इंडियन फिल्ड गन’ने फायरिंग सुरु होती. त्यावेळी ‘शेल’चा ब्लास्ट झाल्याने त्याचा तुकडा अग्निवीर जवानांच्या शरीरात घुसला. दोघेही गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोहिल विश्वराज सिंग (वय 20) आणि सैफत शित (वय 21) अशी शहीद झालेल्या दोघांची नावे आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला लाल किल्ल्यावर २१ तोफांची सलामी दिली जाते. आता भारतीय बनावटीच्या ‘इंडियन फील्ड गन’चा वापर करण्यात येतो. इंडियन फील्ड गनचे तीन प्रकारचे मॉडेल आहेत, यामध्ये MK-1, MK-2 आणि ट्रक माउंटेड असे आहेत. वजनाने हलकी असलेली तोफ तीन तुकड्यांमध्ये कुठेही नेणे शक्य होते.

अग्निपथ योजनेबद्दल

  • अग्निवीर म्हणून निवड होण्यासाठी तरूणांनी १७- २३ अशी वयाची अट आहे. तर प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. केंद्र सरकारने २०२२ साली अग्निपथ योजना सुरू केली होती.
  • या योजनेअंतर्गत निवड झालेल्या तरूणांना अग्निवीर असं म्हटलं जातं. तर चार वर्षे सेवा दिल्यानंतर यामध्ये मासिक वेतनानंतर या तरूणांना १० ते १२ लाख रूपयांची रक्कम दिली जाते. तर २५ टक्के तरूणांना दीर्घ कालावधीसाठी मुदत वाढवून दिली जाते.
  • अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/ स्टोअर कीपर, अग्निवीर व्यापारी अशी पदे आहेत. अग्निवीर योजनेमधील सर्वात जास्त तोटा म्हणजे या चार वर्षे देऊनही नंतर उमेदवार बेरोजगार होणार आहेत. इतर नोकऱ्यांप्रमाणे कोणतेही मूलभूत लाभ या उमेदवारांना मिळत नाहीत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *