ग्रामपंचायत निवडणुकीत झाले भानामतीचे प्रकार

 ग्रामपंचायत निवडणुकीत झाले भानामतीचे प्रकार

सांगली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी कंबर कसलेली आहे , त्यातच विरोधकांच्यावर भानामती करण्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि वाळवा या तालुक्यात हे प्रकार आढळून येत आहेत. उमेदवार निवडून येण्यासाठी जादुटोणा भानामतीचा प्रकार उघडकीस येत आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्या तील वारणाकाठी असलेल्या कनेगावात ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्यासाठी आता अंधश्रद्धेचा आधार घेतला जात आहे. कोणीतरी दुरडीत केळी, कापडपीस, बाहुल्या, लिंबू, हळदी-कुंकू टाकून हे साहित्य कणेगावच्या चौका चौकात मध्यरात्री ठेवले होते.

वाळवा तालुक्यातील कनेगाव येथील मारूती चौक, हायस्कूल चौक, भरतवाडी रोड, नवीन गावठाण वसाहत अशा प्रत्येक ठिकाणी अशा भानमतीच्या दुरड्या दिसत आहेत.

खानापूर तालुक्यातील जाधवनगर येथे ही भानामतीचा प्रकार समोर आला आहे. प्रचाराच्या बॅनर समोर नारळ, हळदी कुंकू, लिंबू आढळून आले आहे. या घटनेने परिसरात विविध चर्चा रंगू लागली आहे.

ML/KA/SL

16 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *