शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीत काळ्या जादूचा बोलबाला

 शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीत काळ्या जादूचा बोलबाला

छायाचित्र प्रातिनिधीक

चंद्रपूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राजुरा शहरात शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत निवडणुकीत काळ्या जादूचा धक्कादायक बोलबाला उघड झाला आहे. पीडितांच्या घरी जाऊन प्रतिस्पर्धी गटाच्या उमेदवारांनी भारलेल्या बाहुल्या आणि हळद-कुंकू लावलेल्या वस्तू टाकल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी अद्याप मात्र गुन्हा दाखल केलेला नाही. 

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात एका शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीत काळ्या जादूचा बोलबाला उघड झालाय. पीडितांच्या घरी जाऊन प्रतिस्पर्धी गटाच्या उमेदवारांनी भारलेल्या बाहुल्या आणि हळद-कुंकू लावलेल्या वस्तू टाकल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले.  कै. बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत निवडणुकीत हा धक्कादायक प्रकार घडलाय.

ऐन निवडणूक काळात प्रतिस्पर्धी उमेदवार घरी आल्याने पीडित बुचकळ्यात पडले. ते परत गेल्यावर सर्वच पीडितांच्या घरच्या सोफ्यामध्ये दडविलेल्या तंत्र-मंत्र भारीत बाहुल्या आढळल्याने पोलिस तक्रार करण्यात आली.  पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कलमांतर्गत  चौकशी सुरू केली असून अंनिस कार्यकर्त्यांनी या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

वैज्ञानिक जाणीवा विकसित करण्याची जबाबदारी असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये अशा पद्धतीने अंधश्रद्धेचे भूत पसरले असताना त्यांच्याकडून अपेक्षा ती काय करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेत होणारा विलंब देखील भुवया उंचावणारा ठरलाय.

SL/KA/SL

29 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *