फडणवीस यांना बेळगावात दाखवले काळे झेंडे
बेळगाव, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलकांनी बेळगावात काळे झेंडे दाखविले. ते भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी तिथे गेले होते.
मात्र भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पक्ष आहे.
यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी इथे आलो.मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी इथे आलो आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी आज बेळगाव इथं पत्रकारांना सांगितले. विलासराव देशमुख देखील मुख्यमंत्री असताना कर्नाटकात ते सगळीकडे फिरत होते. मीही माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी इथं आलो आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषकांच्या मागे मी आणि भारतीय जनता पार्टी देखील आहे. म्हणूनच भाजपने मराठी बोर्ड येथे तयार केला असेही त्यांनी पत्रकार न सांगितले. संजय राऊत काँग्रेसची दलाली करण्यासाठी इकडे येत आहेत,
राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी इकडे येणार नाही असा टोला फडणवीस यांनी राऊत यांना लगावला.
संजय राऊत यांचा मित्रपक्ष काँग्रेस आहे त्यांनी त्यांना सांगायला हवे होते की इथे उमेदवार उभे करू नये
काँग्रेसच्या सांगण्यावरून भाजपची मते कमी करण्यासाठी संजय राऊत दलाली करीत इथे आले असल्याचे त्यांनी सांगितले. शिल्लक सेनेकडे मुद्दे नसले की असे मुद्दे मांडतात. मात्र शरद पवार यांनी त्यांचे सर्व मुद्दे नेस्तनाबूत केले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.Black flags shown to Fadnavis in Belgaum
ML/KA/PGB
4 May 2023