अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि डीव्हीआर ATS च्या हाती

 अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि डीव्हीआर ATS च्या हाती

अहमदाबाद, दि. १३ : अहमदाबादमध्ये काल झालेल्या AIR India च्या भीषण अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी असलेल्या एका मेडिकल हॉस्टेलजवळ कोसळलं. यामुळे विमानाला आग लागली. या विमान अपघातानंतर तात्काळ तपास सुरु करण्यात आला. एअर इंडियाच्या विमान एआय-१७१ अपघाताच्या २७ तासांनंतर, आज विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) ने ब्लॅक बॉक्स जप्त केला. ते वसतिगृहाच्या छतावर सापडले. याद्वारे आपल्याला अपघातापूर्वीच्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडले हे कळू शकेल.

एफएसएलसह इतर एजन्सींकडूनही कसून तपासणी सुरू आहे. एटीएसकडून या अपघाताची चौकशी सुरु असून त्यांना विमानाचा महत्त्वाचा भाग असलेला डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर (डीव्हीआर) सापडला आहे. ज्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) असेही म्हणतात. त्यामुळे आता नेमका अपघात का आणि कसा झाला याचा संपूर्ण उलगडा झाला आहे.

डीव्हीआरच्या तपासणीतून अपघाताबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे. या अपघाताची चौकशी करण्यासाठी अमेरिकन एजन्सीही मदत करणार आहे. विशेषतः बोईंग विमानाशी संबंधित तांत्रिक बाबींची तपासणी केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

सीव्हीआर हे एक लहान, मजबूत इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, जे विमानाच्या कॉकपिटमध्ये येणाऱ्या सर्व आवाजांची नोंद करते. याला ‘ब्लॅक बॉक्स’चा एक भाग मानले जाते. विमान अपघात झाल्यास संपूर्ण अपघाताची चौकशी करण्यास ते मदत करते.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *