पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे भाजपा व्यापारी आघाडीचा पुढाकार

 पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे भाजपा व्यापारी आघाडीचा पुढाकार

पुणे, दि २९: महाराष्ट्रातील पूरग्रस्त बांधवांसाठी भाजपा, पुणे शहर यांच्या वतीने मदत साहित्य संकलनाचा मोठा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात भाजपा व्यापारी आघाडी, पुणे शहर यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. व्यापारी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर योगदान दिले.

अनेक देणगीदारांनी अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू व अन्य साहित्य तसेच रोख स्वरूपात मदत दिली. हे मदत साहित्याचे पाकीट तयार करून भाजपा शहराध्यक्ष श्री. धीरजजी घाटे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्ष कार्यालयात सुपूर्द करण्यात आले.

या उपक्रमात व्यापारी आघाडीचे अध्यक्ष श्री. उमेशभाई शाह, सरचिटणीस श्री. महेश गुप्ता यांच्यासह धवल पटेल, विक्रम चव्हाण, सुधींद्र कुलकर्णी, अंकित तिवारी, गजेंद्र देशपांडे, विजय नरैला, विजय शेखदर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. धनंजय भाई वाल्हेकर यांनी सुद्धा मोठ्या संख्येने अन्नधान्य पाकिटांचे प्रायोजन केले व या उपक्रमात मोलाचे योगदान दिले.

या वेळी सरचिटणीस श्री. महेश गुप्ता म्हणाले की, “हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित नाही, तर समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आणि ऐक्य याचे प्रतीक आहे. ‘मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा’ या तत्वाने प्रेरित होऊन व्यापारी आघाडी पुढेही असेच समाजोपयोगी उपक्रम राबविणार आहे.”

या उपक्रमामुळे पुणे शहरातील व्यापारी व कार्यकर्त्यांनी दाखवलेले ऐक्य, त्यागभावना आणि मदतीची वृत्ती खर्‍या अर्थाने प्रेरणादायी ठरली आहे.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *