भाजपचे संकल्पपत्र प्रसिद्ध
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाने आज महाराष्ट्र विधानसभेसाठी आपले संकल्पपत्र प्रसिद्ध केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपाचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते यावेळी उपस्थित होते.
- लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार 2,100 रुपये , म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये
- शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी शेतकरी सन्मान निधीत वाढ 12,000 रुपये ऐवजी 15,000 रुपये मिळणार आणि MSP वर 20% अनुदान देणार
- प्रत्येक गरीबाचं स्वप्न पूर्ण होईल, भाजप-महायुती अन्न सुरक्षा आणि हक्काचं घर देईल
- वृद्ध पेन्शन धारकांचा सन्मान, महिन्याला ₹2100 म्हणजेच वर्षाला ₹25,200 चा आधार
- राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहणार
- 10 लाख विद्यार्थ्यांना मिळणार ₹10,000 विद्यावेतन आणि 25 लाख रोजगार निर्मिती करणार
- ग्रामीण विकासाला मिळणार नवी दिशा 45,000 गावांत पांदण रस्त्यांची बांधणी होणार
- अंगणवाडी आणि आशा सेविकांना ₹15,000 वेतन आणि विमा संरक्षण
- वीज बिलात 30% कपात होणार, सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार
- सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत ‘व्हिजन महाराष्ट्र @2028’ सादर करण्यात येईल
- महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य भाजपा करणार साकार
- मेक इन महाराष्ट्र बनवेल राज्याला फिनटेक आणि AI ची राजधानी नागपूर, पुणे, नाशिक सारखी शहरे बनणार एयरोस्पेस हब
- खतांवरील SGST कर मिळणार परत सोयबिनला प्रति क्विंटल किमान रु. 6000/- भाव देणार
- 2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार 500 बचतगटांसाठी 1000 कोटींचा फिरता निधी उपलब्ध होणार
- अक्षय अन्न योजनेद्वारे कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मिळणार मोफत अन्नधान्य
- महारथी आणि अटल टिंकरिंग लॅब्स योजनेतून सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि AI चे प्रशिक्षणाची संधी होईल उपलब्ध
- महाराष्ट्रात होणार कौशल्य जनगणना उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करणार
- प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून घडवणार 10 लाख उद्योजक
- एससी, एसटी, ओबीसी समाजातून उद्योजक घडवण्यासाठी 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज
- ओबीसी, एसबीसी, इडब्लुएस आणि वीजेएनटी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती मिळणार
- युवकांसाठी स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ्य कार्ड आणिवार्षिक आरोग्य तपासणी
- महाराष्ट्राच्या गौरवशाली किल्ल्यांचे संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचे जतन
- ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण आधार-सक्षम सेवा तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र ओपीडी
- सक्तीच्या धर्मांतरणाविरोधात कायदा करणार फसव्या धर्मांतराला आळा बसणार
- आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानव-वन्यजीव संघर्ष टाळणार तसेच वन्यप्राण्यांपासून होणारी जीवितहानी रोखणार
ML/ML/SL
10 Nov. 2024