भाजपच्या देणग्यांमध्ये तब्बल २११ टक्के वाढ

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय पक्षांचे पक्षांतर्गत देशव्यापी काम सातत्याने सुरु ठेवण्यासाठी मोठ्या रक्कमेची आवश्यकता असते. यासाठी व्यक्ती आणि संस्थांकडून राजकीय पक्ष देणग्या स्वीकारतात. निवडणूक काळात किती खर्च करावा यावर बंधन असले तरीही त्या व्यतिरिक्त राजकीय पक्षांचा निधी किती असावा यावर कोणतीही मर्यादा नाही. गतवर्षी सत्ताधारी भाजपाला २,२४३ कोटी रुपयांची देणगी मिळाली असून तो देशातील सर्वाधिक देणगी घेणारा राष्ट्रीय पक्ष असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिसर्च या अहवालातून समोर आली आहे.
पक्षांना मिळालेल्या एकूण घोषित देणग्यांची रक्कम २,५४४.२८ कोटी रुपये आहे. ही रक्कम १२,५४७ देणगीदारांकडून मिळाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा १९९ टक्के जास्त आहे. एकूण घोषित देणग्यांपैकी ८८ टक्के देणग्या एकट्या भाजपला मिळाल्या आहेत. भाजपच्या देणग्यांत २११.७२ टक्के वाढ झाली आहे.
काँग्रेसला आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ७९.९२४ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या तर २०२३-२४ मध्ये २८१.४८ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. ही वाढ २५२.१८ टक्के इतकी असल्याचे अहवालात म्हटले आहे.
सर्वाधिक देणगीदार पुढीलप्रमाणे : प्रुडंट ट्रस्ट ८८० कोटी, ट्रायम्फ १२७ कोटी, डिराइव्ह इनव्हेस्टमेंट ५० कोटी, अॅक्मी सोलर ५१ कोटी, रुंगता सन्स ५० कोटी, भारत बायोटेक ५० कोटी, आयटीसी इन्फो ३० कोटी, दिनेश चंद्र आर. अग्रवाल इन्फ्रेंकॉन ३० कोटी, दिलीप बिल्डकॉन लिमिटेट २९ कोटी, मॅक्रोटेक डेव्हलपर्स २७ कोटी.
भाजप- २,२४३ कोटी
काँग्रेस- २८१ कोटी
‘आप’ – १,६७१ – ११ कोटी रुपये
माकप- ५१५ – ७ कोटी
सर्वाधिक देणग्या या राज्यांतून :
गुजरात ४०४ कोटी,
महाराष्ट्र ३३४ कोटी,
इतर राज्ये ५५४ कोटी,
दिल्ली ९८९ कोटी,
तेलंगणा ११२ कोटी,
तामिळनाडू १४२ कोटी.
SL/ML/SL
10 April 2025