‘अबकी बार ४०० पार’ साठी भाजपची ४० स्टार प्रचारकांची फौज
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूकांसाठी सत्ताधारी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यावर्षी लोकसभेच्या ४०० हून अधिक जागा मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या भाजपने नेहमी प्रमाणेच रणनीति आखत मोठमोठ्या नेत्यांना प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवले आहे. भाजपाकडे उत्तम संघटन कौशल्य आणि वक्तृत्वशैली असलेल्या नेत्यांची काही कमी नाही. त्यातच आता अन्य पक्षांतील बडे नेतेही भाजपच्या वळचणीला गेले आहेत. प्रचारासाठी चोख आखणी करण्यात वाकबगार असलेल्या भाजपाने आता जागांचा टप्पा गाठण्यासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
१९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाने यावेळी अबकी बार ४०० पार हा नारा दिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. या पार्श्वभूमीवर हे स्टार प्रचारक कोण हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्रातले २० स्टार प्रचारक
१) एकनाथ शिंदे
२) अजित पवार
३) देवेंद्र फडणवीस
४) रावसाहेब दानवे
५) सम्राट चौधरी
६) अशोक चव्हाण
७) विनोद तावडे
८) पंकजा मुंडे
९) चंद्रशेखर बावनकुळे
१०) आशिष शेलार
११) सुधीर मुनगंटीवार
१२) राधाकृष्ण विखे पाटील
१३) पियूष गोयल
१४) गिरीश महाजन
१५) विजयकुमार गावित
१६) अतुल सावे
१७) धनंजय महाडीक
१८) अमर साबळे
१९) रविंद्र चव्हाण
२०) चंद्रकांत पाटील
देशपातळीवरील २० स्टार प्रचारक
१) नरेंद्र मोदी
२) जे.पी. नड्डा
३) राजनाथ सिंह
४) अमित शाह
५) नितीन गडकरी
६) योगी आदित्यनाथ
७) प्रमोद सावंत
८) भुपेंद्र पटेल
९) विष्णू देव साई
१०) डॉ. मोहन यादव
११) भजनलाल शर्मा
१२) रामदास आठवले
१३) नारायण राणे
१४) अनुराग ठाकूर
१५) ज्योतिरादित्य सिंधिया
१६) स्मृती इराणी
१७) शिवराज चौहान
१८) के. अण्णमलई
१९) रवि किशन
२०) मनोज तिवारी
SL/ML/SL
27 March 2024