शहापूर तालुक्यातील उबाठा, शरद पवार गट व काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दि २५
शहापूर तालुक्यातील उबाठा सेना, शरद पवार गट तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. शहापूर तालुका उबाठा सेनेच्या आदिवासी आघाडीचे अध्यक्ष व शिरोळचे सरपंच संतोष आरे यांच्या नेतृत्वाखाली ‘उबाठा’ च्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, पांडुरंग बरोरा, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी, तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, गणेश राऊत, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये शहापूर पंचायत समितीचे 4 माजी सदस्य, 12 सरपंच, 8 माजी सरपंच तसेत अनेक ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहोरात्र झटत आहेत. जनजाती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत शासकीय योजना आणि प्रत्येक वाडी वस्ती पर्यंत रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आज ज्या विश्वासाने या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. अपेक्षेपेक्षा अधिक विकास या परिसराचा आम्ही करून दाखवू हे आश्वासन श्री. चव्हाण यांनी दिले.
माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले की, भाजपाच्या विचारधारेवर सर्वांचा विश्वास आहे. विकासाच्या माध्यमातून केंद्र व राज्य स्तरावर जनतेच्या मनात भाजपाबद्दल विश्वास निर्माण झाल्यामुळे या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात तालुक्यातून दोन आकडी जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याचा सर्वांनी निर्धार केल्याचे श्री. पाटील म्हणाले.
भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये पंचायत समिती माजी सदस्य एकनाथ भला, दत्ता हंबीर, पिंटू फसाले, संदीप थोराड, दहीगावचे सरपंच भास्कर आरे, तळवाडा सरपंच अंकुश वरतड, तुकाराम वाख, किसन मांगे, मारुती साठे, शरद पवार गटाचे अमित हरड, सचिन सातपुते, समीर खंडवी, निखील सातपुते आदींचा समावेश आहे.KK/ML/MS