जिल्हा गडचिरोलीत अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपा कार्यशाळा संपन्न

 जिल्हा गडचिरोलीत अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपा कार्यशाळा संपन्न

गडचिरोली प्रतिनिधी
राष्ट्रमाता आणि भारतीय स्त्रीशक्तीचे सर्वोच्च प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने सर्किट हाऊस (शासकीय विश्रामगृह), गडचिरोली येथे भव्य जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री व खासदार मा. डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थिती लावली. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार देशभरात सामाजिक उपक्रमांद्वारे अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्याचे महत्त्व विशद केले.
“अहिल्याबाई होळकरांचे जीवन म्हणजे कर्तृत्व, त्याग व निष्ठेचे प्रतीक असून, त्यांच्या आदर्श जीवनमूल्यांचे प्रतिबिंब समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व मंडलस्तरावर विविध उपक्रम राबवावेत,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या प्रेरणादायी कार्यशाळेत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले मान्यवर:
प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, समन्वयक प्रमोदजी पिपरे, कि.मो. प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, योगीताताई पिपरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, अरुणजी हरडे, ज्येष्ठ नेत्या प्रतीभा चौधरी, माजी तालुका अध्यक्ष विलास पा. भांडेकर, माजी शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहराध्यक्षा कविता उरकुडे, तसेच मंगेश रणदिवे, अविनाश महाजन, कलिम शेख, विनोद देवोजवार, अविनाश विश्रोजवार, विवेक बैस, रमेश नैताम, रुमनबाई ठाकरे, पुष्पा करकाडे, सोमेश्वर धकाते, देवाजी लाटकर आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडून आगामी काळात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण करीत जिल्हाभरात सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रम राबवण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *