भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या राष्ट्रवादीच्याच लोकांना भाजपने मंत्रिमंडळात घेतले

 भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या राष्ट्रवादीच्याच लोकांना भाजपने मंत्रिमंडळात घेतले

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप एका बाजूला करीत दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावर हे आरोप केले त्यातल्या काही लोकांना भाजपने आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे, त्यामुळे आपल्या पक्षावरील आरोप चुकीचे असल्याचे पंतप्रधान मोदींचे आभार मानतो असे सांगत ज्यांनी शपथ घेतली त्यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

आज झालेला प्रकार मला नवीन नाही यापूर्वी देखील असेच घडले होते , १९८० साली असेच घडले होते, मात्र त्यावेळी केवळ पाच आमदार घेऊन मी पक्ष बांधला आणि यापुढेही तेच करीन असा निर्धार शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आज जो प्रकार घडला त्याची चिंता नाही , उद्या सकाळी कराडला यशवंतरावांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुढे जाईन असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी वर कोणी दावा करीत असेल तरी माझे काही म्हणणे नाही , मी लोकांमध्ये जाऊन माझी भूमिका मांडेन आणि लोकांचा पाठिंबा मिळवेन असे पवार म्हणाले. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा कधी दिला माहीत नाही मात्र कदाचित त्यांनी तो विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे परस्पर दिला असेल तर माहिती नाही असेही त्यांनी सांगितले.

आमची खरी शक्ती सर्वसामान्य जनता आहे , त्यामुळे माझा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे, आजच्या घटनेमुळे कार्यकर्ते अस्वस्थ असतील त्यांना विश्वासात घेऊन पुढे जाईन. ज्यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात भूमिका घेतली त्यातील काहींनी आपण त्या निर्णयाशी आपण सहमत नाही असे त्यातीलच काहींनी आपल्याला सांगितले आहे, त्यातील काही जण दोन तीन दिवसात आपल्याला भेटतील असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.BJP took people from NCP who were accused of corruption in the cabinet

देशातील अनेक नेत्यांचे मला फोन आले आहेत, माझे घर फुटले असे वाटत नाही, हा विषय धोरणाचा आहे घराचा नाही , प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात भूमिका घेतली आहे, त्यांची नेमणूक मी केली होती, तेव्हा त्यांनी स्वतःहून आपली बाजू स्पष्ट करावी अथवा आपल्याला कारवाई करावी लागेल असे ते म्हणाले. आजच्या घडामोडीत काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी जे आरोप केले त्याचा निश्चित परिणाम झाला असे म्हणावे लागेल, त्यामुळे इडी अथवा अन्य कारवाया अशा सगळ्याचा परिणाम झाला असा थेट आरोप पवारांनी केला . मात्र काही काळापुरते आज शपथ घेतलेले चिंतामुक्त झाले असतील परंतु त्यांच्या भवितव्याची चिंता आपल्याला वाटते असेही त्यांनी सांगितले.

ML/KA/PGB
2 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *